Marathi Entrepreneurs Network - MEn

Marathi Entrepreneurs Network - MEn

2471 10 Organization

9665013100 menpune@gmail.com www.men.net.in

Narmada, 806 B, Bhandarkar Road, Pune, Pune, India - 411004

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

10 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Marathi Entrepreneurs Network - MEn in Narmada, 806 B, Bhandarkar Road, Pune, Pune

नमस्कार, मराठी Entrepreneurs.
प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते, आपला व्यवसाय वाढावा. तो सर्वदूर पोहोचावा. आर्थिक स्थैर्य लाभावे. त्यासाठी महत्वाचे ठरते नेटवर्किंग. म्हणूनच मराठी Entrepreneurs च्या व्यवसायवृद्धीकरिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs Netwok.

ज्याचा उद्देश आहे फक्त आणि फक्त व्यवसायवृद्धी हाच.

दिवसाचे फक्त २४ तासच आपल्याकडे असतात. यातील फार तर ८ ते १० तासच आपण काम करु शकतो. एखाद्या व्यावसाईक आपले काम करण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक करतो. उदा. एखाद्याकडे जर १५ व्यक्ती काम करत असतील तर १५ X १० = २०० तास त्याचेसाठी काम केले जाते व त्याचे उत्पन्नही वाढते. मात्र अशा व्यक्तीना त्याला पगार द्यावा लागतो तसेच अशा व्यावसाईक व्यक्तीला त्याचे व्यवसायात फार मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. परत जर व्यवसायात अपेक्षीत धंदा झाला नाही तर मोठे नुकसान होण्याचीही शक्यता असते.

कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायात यशाचं शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या शिडीच्या पहिल्याच पायरीला ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणतात! आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिझनेस डेव्हलपमेंटचाच एक मुख्य भाग बनला आहे. ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना आपल्या देशात पूर्वीपासून होती पण साधारणपणे गेल्या दशकात या संकल्पनेला लोकमान्यता मिळाली व मोठय़ा प्रमाणात रुजत गेली.

खास करून मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना अधिक गंभीरपणे घ्यायला हवी. सुदैवाने मराठी समाजातील आजच्या पिढीच्या उद्योजकांत आणि प्रोफेशनल्समध्ये मोठय़ा प्रमाणात नेटवर्किंगचे ज्ञान आहे आणि विविध स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमांतून मराठी माणसं एकत्र येऊन काम करताना दिसतात.

बिझनेस नेटवर्किंग म्हणजे आपली उत्पादने विकण्याचे मार्केट नाही किंवा आपण काही तरी विकत घेतलेच पाहिजे असा नियम नाही. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर पैशाचा किंवा कुठला तरी व्यवहार झाला पाहिजे असा नियमही नाही.

मग ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे?
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे आपल्या उद्योगासंबंधित विषयांत काम करणाऱ्या आणि एकूणच उद्योगविश्वाशी निगडित असणाऱ्या जास्तीतजास्त लोकांशी आपला चांगल्या प्रकारचा परिचय करून घेणे असा आहे.

प्रत्येक व्यक्तीकडे त्याच्या क्षेत्रातील ज्ञान असतं, अनुभव असतात, इतर लोकांची माहिती असते ती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. माणसांची ओळख त्यांच्या ‘व्हिजिटिंग कार्डस्’वरून किंवा टेलिफोन नंबरची माहिती मिळवून होत नाही. स्वत:विषयीची माहिती सांगून किंवा इतरांची माहिती ऐकून सुरुवातीचं बोलणं जरी सुरू होत असलं तरी अर्थपूर्ण ‘संवाद’ होतोच असं नाही. तोंडओळख करणं सोप आहे, पण नीटपणे माणसं ओळखायला आणि जोडायला खास प्रयत्न करावे लागतात. आपल्याला कुठल्याही व्यक्तीशी प्रेमाने, हक्काने किंवा अधिकाराने बोलता येणं महत्त्वाचं आहे.

‘नेटवर्क’ म्हणजे ‘लोकसंग्रह’ आणि ‘बिझनेस नेटवर्क’ म्हणजे उद्योगाशी संबंधित लोकांचा संग्रह. सुरुवातीला नुसतं बिझनेस नेटवर्क करता येणं शक्य नाही कारण जोपर्यंत आपण आपला लोकसंग्रह वाढविणार नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की कोण आपल्या उद्योगाशी संबंधित आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपला लोकसंग्रह वाढवणे क्रमप्राप्त आहे! आपण एका दिवसात १०० लोकांना जरी भेटलो तरी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांच्याबद्दल उपयुक्त माहिती मिळवायला वेळ लागतोच.

कुठलाही उद्योग सुरू करताना किंवा नंतर लागणाऱ्या भांडवलापासून, परदेशी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, प्रोडक्ट्स, ब्रॅण्ड्स, अ‍ॅडव्हर्टायझिंग, ह्यूमन रिसोर्स, विविध सहकाराचे करार किंवा इतर कुठल्याही टेक्निकल गोष्टींची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्या त्या क्षेत्रातील जाणकार लोकांची माहिती ही असायलाच हवी. आता प्रश्न असा आहे की, अशी तज्ज्ञ, जाणकार आणि अनुभवी माणसं मिळणार कुठून ? म्हणूनच लोकसंग्रह दांडगा असणं फार गरजेचं आहे.

लोकसंग्रह कसा वाढतो?

लोकसंग्रह हा आपोआप वाढत नाही तर तो एका जाणीवेने वाढवावा लागतो. लोकसंग्रह वाढवणे ही एक कला आहे. आणि म्हणूनच या..... ME नेटवर्कमध्ये सहभागी व्हा..... प्रत्यक्ष भेटा.... आपला व्यवसायाबद्दल सांगा.... आपले विचार शेयर करा..... आपले नेटवर्क वाढवा.... आणि अनुभवा आपल्या व्यवसायामधील यश....

Popular Business in pune By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.