Shree Swami Samarth Math Kothrud

Shree Swami Samarth Math Kothrud

1398 7 Hindu Temple

SR.No.84/165, Suraksha Housing Society, Shastrinagar, Kothrud, Pune, India - 411038

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

7 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Shree Swami Samarth Math Kothrud in SR.No.84/165, Suraksha Housing Society, Shastrinagar, Kothrud, Pune

मठाविषयी थोडेसे

इ.स. १९९७ साली श्री स्वामी समर्थांच्या कृपाशिर्वादाने व् सद्गुरु श्री गुरुनाथ मुंगळे (सर), कोल्हापुर यांच्या मार्गदर्शनाने, छोट्या स्वरूपात स्वामींच्या मठाची सुरुवात केली. हे स्वरुप सुरुवातीला खुपच छोटे, म्हणजे, चार वासे व त्यावर तीन पत्रे आणि स्वामीच्या फोटोसाठी एक चौथरा असे होते. २६ एप्रिल १९९८ रोजी या छोट्या स्वरुपाचे, महाराजांच्या अशीर्वादाने, एका वास्तुत रूपांतर झाले.
या मठाच्या वास्तू मध्ये, महाराजांचा सहा फुटी फोटो बसवण्यात आला व त्याचे अनावरण सद्गुरु श्री गुरुनाथ मुंगळे (सर) यांनी केले. त्यानंतर महाराजांच्या चांदीच्या पादुका अभिषेकासाठी करून घेण्यात आल्या. दैनंदिन सेवा व आरती महाराज रोज आमच्या कडून करून घेतात, हीच आमची सर्व सेवेकऱ्यांची भावना आहे. मठामध्ये वार्षिक उत्सव, नामस्मरण, सामाजिक उपक्रम देखील चालू असतात.
वरील सर्व सेवा चालू असतानाच स्वामींच्या आशीर्वादामुळे व भक्तांच्या सहकार्यामुळे मठाचे बांधकाम पक्क्या स्वरुपात व दुमाजली करण्यात आले. मठामध्ये खालील मजल्यावर अक्कलकोटच्या धर्तीवर गाभाऱ्याचे स्वरूप करण्यात आले म्हणजे, खालील बाजूस शिवलिंग स्थापन करून त्यावर स्वामींचा चांदीचा मुखवटा बसविण्यात आला व शिवलिंगाच्या मागील बाजूस स्वामींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मठाच्या वरील मजल्यावर स्वामींची फोटो फ्रेम गादी व लोड ठेऊन ध्यान मंदिर करण्यात आले. ज्या भाविकांना जप, वाचन, ध्यान करावयाचे असते ते सर्व भाविक ध्यान मंदिराचा उपयोग करतात. अशा प्रकारे स्वामी आम्हा सेवेकऱ्यांकडून मठामध्ये सेवा, पूजा, अर्चा, आरती इत्यादी करवून घेतात, याचा सर्व भक्तांना व सेवेकऱ्यांना आनंद आहे.
अशी सेवा महाराजांनी आमच्या कडून सतत करवून घ्यावी ही स्वामी चरणी आम्हा सर्वांची प्रार्थना आहे.

Popular Business in pune By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.