Saptarang - सप्तरंग

Saptarang - सप्तरंग

65 0 Local Business

8087215987

Gangawesh, Kolhapur, India -

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
0

0 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Saptarang - सप्तरंग in Gangawesh, Kolhapur

कोल्हापूरसारखं परंपरा जपणारं शहर. इथे राहून त्या परंपरांचा पाईक होणार नाही तो अस्सल कोल्हापूरकर नाहीच. नव्या जुन्याला एकत्र करून, पर्यावरणपूरक पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती नेणं आज खूप महत्वाचं आहे. आणि या कार्यात मोलाचा सहभाग बजावत सप्तरंग ग्रुपने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. सात जणींनी सुरु केलेला हा समूह आज भगिनींच्या साथीने मोठा होत आहे. लोकांपर्यंत पोहोचत आहे. समूह सुरु करताना "आपले पारंपरिक खेळ नवीन पिढीला कळावेत" असा एक सरळ, एकमार्गी हेतू होतापण आज या समूहाचा बराच विस्तार झालेला आहे.
जुन्या पिढीला पारंपरिक खेळ माहित असतात पण वयानुसार ते खेळता येत नाहीत. आणि नवीन पिढी खेळ खेळू शकते पण त्यांना ते माहीतच नसतात. अशा परिस्थितीत, मंगtळागौरीच्या निमित्ताने हे खेळ खेळले जातील, नवीन पिढीला समजतील या भावनेने सप्तरंगची स्थापना झाली. जशी जशी त्याची व्याप्ती वाढत गेली तसं तसं मग या खेळांच्या माध्यमांतून आपण ‘व्यायामाचं महत्व सांगू शकतो, त्यातून मिळणारी ऊर्जा, प्रेरणा यांबद्दल बोलू शकतो. वेळेचं नियोजन, पर्यावरण संवर्धन या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करू शकतो’ हे सप्तरंगाच्या लक्षात आलं. आणि या विचारातूनच ‘सप्तरंग-स्टाईल’ मंगळागौरीची संकल्पना निर्माण झाली. आज या खेळाच्या माध्यमातून सप्तरंगाच्या भगिनी पूर्वापार चालत आलेली व्रतं-वैकल्य, त्यामागे असणारा शास्त्रीय दृष्टीकोन, ऋतूमानानुसार त्या त्या सणाच्या वेळेस घ्यावा असा आवश्यक परिपूर्ण आहार याची माहिती देतात. उदाहरण द्यायचं तर ‘श्रावणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी, कढी, मटकीची उसळ, पचायला हलके असे भाजके पदार्थ खावेत. वातूळ पदार्थ खाऊ नयेत.’ श्रावणामध्ये येणारी मंगळागौर आपल्याला काय काय शिकवते हे त्या सांगतात, ‘मंगळागौरीसाठी लागणारी फुलं, दुर्वा खुडल्यामुळे आपण एकप्रकारे त्या झुडूपांच्या वाढीला मदत करतो. ठराविक पदार्थ ठराविक संख्येने घेताना एकाग्रता वाढते. मंगळागौरीची गाणी लक्षात ठेवून गाताना स्मरणशक्ती वाढते. उखाणे तयार करून म्हणताना कल्पकता वाढते. या सगळ्या खेळांतून खिलाडूवृत्ती वाढते. शंकर-पार्वतीच्या रूपकात्मक कथांमधून स्त्री-पुरुष समानता रुजते. आणि एकूणच व्यक्तिमत्व विकास होतो.’
मंगळागौरीच्या खेळांसोबतच सप्तरंगमधील भगिनी नवरात्र, गौरी या पारंपरिक सणांची शोभा वाढावी म्हणूनदेखील खेळ खेळत रात्र जागवतात.
महिलांमध्ये उपजतच असणारी सजावटीची आणि नटण्या-मुरडण्याची आवड जोपासण्यासाठी सप्तरंग हे एक माध्यम आहे. आरोग्यदायी स्त्रीत्व ही अतिशय सुखद जाणीव आहे आणि ती जाणीव सर्वांमध्ये रुजावी म्हणून सप्तरंग कार्यरत आहे.

Popular Business in kolhapur By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.