Guhagar - RamKamal HomeStays

Guhagar - RamKamal HomeStays

3064 7 Beach Resort

gajananparchure@yahoo.co.in

Near Ganpati Mandir , Khalchapat , Guhagar , Taluka - Guhagar, Ratnagiri , Maharashtra, Guhagar, India - 415703

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

7 Reviews

5
100%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Questions & Answers

150 / 250 Characters left


About Guhagar - RamKamal HomeStays in Near Ganpati Mandir , Khalchapat , Guhagar , Taluka - Guhagar, Ratnagiri , Maharashtra, Guhagar

गावातल्याच एखाद्या मध्यवर्ती तरी निवांत रस्त्यावरचं टुमदार घर, घराच्या भोवतीनं फुलझाडांची बाग, प्रशस्त, स्वच्छ, शहरी सुखसोयी, भरपूर उजेड असलेलं घर! घराच्या मागच्या बाजूला दूरवर पसरलेली कोकणचं खास वैभव असलेली वाडी... नारळ, पोफळी, सुपारी, अननस, आंबा अशा उंच वाढलेल्या झाडांच्या गर्द सावलीतून रमतगमत चालत गेल्यावर अवचित समोर येणारा पांढऱ्याशुभ्र रेतीचा किनारा आणि क्षितिजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र... शहरातल्या गजबजाटापासून दूर जात चार निवांत क्षण घालवायचे ठरवल्यानंतर पहिलं नाव सुचतं, ते पर्यटकांच्या लाडक्या कोकणाचं... कोकणात राहायचं म्हटल्यावर राहाण्याची घरगुती सोय हवीच. त्यासाठी परचुरे कुटुंबियांचं ‘राम- कमल निवास’ सज्ज झालं आहे.

घराच्या परसातून थेट समुद्रापर्यंत चालत जाण्याचा अनुभव देणाऱ्या खास कोकणी वाडीमध्ये राहाण्याचा आनंद काही औरच असतो. त्याला शहरी सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या निवासस्थानाची जोड मिळाली, तर दुधात साखरच! पर्यटकांची हीच गरज लक्षात घेऊन परचुरे कुटुंबियांनी राम- कमल निवासची उभारणी केली आहे. एकीकडे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या एसी- नॉन एसी खोल्या, टीव्ही, स्वतंत्र बाथरूम्स यामुळे पर्यटकांना शहरी सोयींचा अनुभव घेता येईल, तर वाडीची सैर निसर्गाच्या सान्निध्यात राहाण्याचा अविस्मरणीय अनुभव देतील. स्वच्छ, प्रदूषण नसलेली हवा, चारी बाजूंना असलेली गर्द झाडी, सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानं येणारी जाग तुम्हाला ताजंतवानं करेल.

गुहागर एस.टी. स्टँडपासून राम- कमल निवास चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे येण्याजाण्याचा खर्च तर वाचतोच, शिवाय चालताना कोकणी गावाची जीवनशैली जवळून पाहाता येते. गुहागर हे गाव आदर्श पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जायला लागलं आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्व ठिकाणांनी ते परिपूर्ण आहे. व्याडेश्वर, दुर्गादेवी, श्रीदेव यांसारखी प्राचीन, मनमोहक मंदिरं आणि २.५ मैल लांबीचा पांढऱ्याभुभ्र वाळूचा समुद्रकिनारा ही गुहागरची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. शिवाय, आता बनाना राइड्स, जेट्टी, बंपर राइट्स असे थरारक वॉटर स्पोर्ट्सही गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू झाले आहेत. हेदवीचं गणेशमंदिर, अंजनवेल लाइटहाउस अशी कितीतरी पर्यटनस्थळंही गुहागरपासून १५ ते ३० किलोमीटरच्या परिसरात आहेत. त्यामुळे गुहागरमध्ये राहायची सोय करून कोकण भ्रमंती करणं केव्हाही सोयीचं ठरतं.

तेव्हा सुट्टीसाठी गुहागरमध्ये याल, तेव्हा पांढऱ्याशुभ्र, मऊ रेतीच्या किनाऱ्यावर अनवाणी चालण्याचा आनंद घ्या किंवा निळ्याशार समुद्राच्या लाटा अंगावर घ्या... कोकणचं खास वैभव असलेल्या निसर्गसंपन्न वाडीची सैर करा किंवा वाडीत बसून मोहाच्या नारळपाण्याचा आस्वाद घ्या... व्याडेश्वर, दुर्गादेवी अशा प्राचीन मंदिरांचं दर्शन घ्या किंवा वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवा... मात्र, राहायची सोय फक्त ‘राम- कमल निवास’ मध्येच करा.

Popular Business in guhagar By 5ndspot

© 2024 5ndspot. All rights reserved.