Alpine Rambler's

Alpine Rambler's

857 25 Travel Company

9594747146 alpine.ramblers@gmail.com

, Dombivli, India - 421202

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

25 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Alpine Rambler's in , Dombivli

_Alpine Ramblers_*...
शब्दांची फोड करून त्यांचा अर्थ लावला तर त्यांचा खरा अर्थ आणि त्यातील depth लक्षात येते...
तसंच Alpine Ramblers मधील Alpine म्हणजे उंचच उंच डोंगर, पर्वत , खोल दऱ्या आणि Rambler म्हणजे गिर्यारोहक
त्यामुळे शब्दशः अर्थ लावला तर डोंगर, पर्वत दऱ्या सर करणारा म्हणजे Alpine Rambler
गिर्यारोहण म्हणजे काही लोकांची picnic अशी संकल्पना असते... सकाळी घरून डबा घेऊन जायचा... इकडे तिकडे फिरायचं , फोटो काढायचे, २-४ डोंगर चढायचे-उतरायचे आणि रात्री परत घरी
पण प्रत्यक्षातील अर्थ आणखी खोल आहे
आणि ज्यांना तो खरा अर्थ उमगतो ते झपाटल्यासारखे वागतात
कारण जिथे आपण जातो तिथला निसर्ग आपल्याला मिनिटामिनिटाला साद घालत असतो... तिथली शांतता... घोंगावणारा वारा... वाहत्या नद्या ... ह्या सगळ्यात आपण आपल्याशीच संवाद साधतो... हे निसर्गाच्या सानिध्यात meditation च करत असतो आपण...
ज्या गडाला आपण भेट देत असतो त्या गडाचा फार मोठा इतिहास असतो... तिथे फार मोठे कट रचले गेले असतात, जय-पराजय झाले असतात... शेकडो माणसांचं तिथे रक्त सांडलेलं असतं... शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पाय लागले असतात... अशा ठिकाणाला भेट देताना आपण जणू काही ते इतिहासातील क्षण पुन्हा जगत असतो
अशा सगळ्या भावना मनात असताना रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी समोर किंवा सिंहगडावरील तानाजींच्या समाधीसमोर डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत
दौलताबाद सारख्या किल्ल्यांची भव्यदिव्यता आपलं मन व्यापून टाकते...
हा आहे 'Alpine Rambling' चा खरा अर्थ...
ह्या एव्हढ्या सगळ्या भावना मनात असताना त्याला picnic म्हणणे उचित नाही
पण ह्या अशा भावनांची जाणीव झाल्याशिवाय त्या अनुभवता येत नाहीत
त्याचसाठी आम्ही हा 'Alpine Ramblers' group बनवला आहे
Group चा मुख्य leader Rushikesh गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळे कठीण-कठीण treks केले आहेत... त्यामुळे त्याच्याकडे प्रचंड first hand experience आहे... व दुसरे leaders (Vijay आणि Sanket) हे दोघं सुद्धा कसलेले Ramblers आहेत.. त्यामुळे कोणकोणते problems येऊ शकतात , त्यावेळी काय काय केले पाहिजे ह्या सगळ्याची Alpine Ramblers तर्फे चोख खबरदारी घेतली जाते...
Alpine Ramblers ची काही खास वैशिष्ट्ये म्हणजे वक्तशिरपणा, उत्तम-रुचकर-ताजं जेवणं, आणि सर्व सभादांच्या सुरक्षिततेची सोय...
वेळ ही सतत धावणारी गोष्ट आहे.. काळ हा कोणासाठीच कधीच थांबत नाही... त्यामुळे Alpine Ramblers च्या planning मध्ये वक्तशिरपणाला खूप महत्त्व आहे. बस कधी निघणार , कधी कुठे पोहोचणार , किती वाजता आपण कुठे असलं पाहिजे, जर काही अडचण आली तर कसा वेळ manage केला पाहिजे ह्याचा Alpine Ramblers कडे चोख आराखडा असतो...
शिवाय group मध्ये कायमच खेळीमेळीच वातावरण ठेवलं जातं. जो माणूस Alpine Ramblers चा भाग होतो तो Alpine Ramblers च्या कुटुंबाचा भाग होतो... मजा, मस्करी, खेळ, गाणी, photo sessions आणि बरंच काही...
असं म्हणतात की 'माणसाच्या मनाचा रस्ता हा त्याच्या पोटातून जातो'... हाच वाक्प्रचार Alpine Ramblers उत्तम रितीने implement करतात.. सर्व सभासदांना पूर्ण आनंद घेता यावा ह्याकरता त्यांचासाठी चविष्ट जेवणाची-नाश्त्याची स्वच्छ ठिकाणी उत्तम व्यवस्था केली जाते...
Rambling च्या वेळी कधीच group तुटू दिला जात नाही... एक leader सगळ्यांच्या पुढून चालतो, दुसरा सगळ्यांच्या मागून आणि तिसरा मधून... ज्यामुळे कुणाला काही अडचण आलीच तर थांबून लगेच मदत करता येते...
ह्या व्यतिरिक्त कठीण ठिकाणी चढाई करण्यासाठी tested equipments वापरली जातात आणि ती कशी वापरायची ह्याच मार्गदर्शन Alpine Ramblersच्या leaders मार्फत दिलं जातं...
ह्या सगळ्या व्यतिरीक्त Alpine Ramblers चे leaders निसर्गाच्या संवर्धनाकडे जातीने लक्ष देतात
Alpine Ramblers चा नियमच असतो "No smoking-no drinking and throwing garbade is prohibited"... नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येते...

तर असा हा group वजा कुटुंब.. जिथे नवीन ओळखी होतात... नवीने मित्र होतात... आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवाव्याशा वाटतील अशा आठवणी तयार होतात...

Writtenn by,
Rajiv Bhide

Popular Business in dombivli By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.